ग्रामपंचायत कु-हेगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

कु-हेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक छोटेसे परंतु प्रगतशील गाव आहे. हे गाव इगतपुरीच्या पूर्वोत्तर दिशेला गोंदे गावालगत वसलेले आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ४७४.७६ हेक्टर (४.७४ वर्ग किमी) असून गावाच्या दक्षिणेकडून ओंडओहोळ नदी वाहते. या नदीवर मुकणे धरण असल्यामुळे गावातील सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे.

कु-हेगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
माहितीचा प्रकारतपशील
ग्रामपंचायत नावकु-हेगाव
तालुका / जिल्हाता. इगतपुरी, जि. नाशिक
भौगोलिक क्षेत्रफळ४७४.७६ हेक्टर (४.७४ वर्ग किमी)
लोकसंख्या१५३० (अनु.जाती – १५३, अनु.जमाती – १५२)
मुख्य व्यवसायशेती, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय
मुख्य पीकभातशेती, भाज्या (खरीप, रब्बी, उन्हाळी हंगाम)
नदीओंडओहोळ नदी (मुकणे धरणामुळे सिंचनाची सोय)
ग्रामपंचायत अधिकारीश्री. आण्णासाहेब एकनाथ सोमवंशी
पदस्थ कर्मचारी१) श्री. समाधान शांताराम धोंगडे – शिपाई
२) श्री. सुनिल चंद्रभान धोंगडे – पाणीपुरवठा कर्मचारी
३) श्री. संजय कारभारी धोंगडे – ग्रामरोजगार सेवक
अंगणवाड्या२ नियमित अंगणवाड्या (पूर्णवेळ कार्यकर्ती व मदतनिसांसह)
शिक्षण संस्थाजि.प. प्राथमिक शाळा (१ ली ते ४ थी), इ-लर्निंग आणि सोलार सुविधा
आरोग्य संस्थानिरंक
धार्मिक उपक्रमवर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी